ठाणे

विकासकांनी सांडपाण्याचा निचरा न केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  

ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रातील मौजे आगासन गावातील  शेतकरी  गुरुनाथ गोविंद मुुडे, यांनी पालिका  आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की.सन 2016 या दोन ते तीन वर्षात माझ्या शेताला लागून मे. अनंतनाथ डेव्हलपर्स या इमारतीत विकासकाचे काम चालू आहे.  परंतु त्या इमारतीमधील सांडपाण्याचा विकासकाने योग्य तो निचरा केलेला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सांडपाणी वाहीनी टाकलेली नाही.
परिणामी   सदर सांडपाणी इमारतीचे काम चालू असलेल्या इमारतीच्या बाजूला माझे शेत सर्वे नं. 135/1 आहे आणि त्या शेेतात सर्व सांडपाणी जाते. त्यामुळे मी गेली दोन ते तीन वर्षे शेती करु शकलो नाही आणि सदर शेती करण्याबाबत शेतीचा कस राहिलेला नाही. त्यामुळे आमच्या उपजिविकेचे साधन नष्ट झाले. त्या इमारत विकासकाला समज देऊन पण ऐकत नाही. उलट आम्हाला धमकी देतो. असे मुंडे यांचे म्हणणे आहे.
 तसेच आयुक्तांनी जोपर्यंत इमारत विकासक सांडपण्याचा योग्य निचरा करत नाही तोपर्यंत त्या इमारती बांधकामांना स्थगिती द्यावी व त्या इमारत विकासकाकडून शेतीची झालेली नुकसान भरपाई करुन घ्यावी. असे पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सदर पत्राची पालिका प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण करावे लागेल असे त्यांनी म्हटलं आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!