गुन्हे वृत्त

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

डोंबिवली  : डोंबिवलीत अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राम फुलचंद कनोजिया असे या आरोपीचे नाव असून हा इसम डोंबिवली (पू) येथील नेहरू रोड वरील सार्वजनिक शौचालयाजवळ संशयास्पदरित्या उभा असलेला पो.ना विशाल वाघ यांना दिसून आला. त्यांनी त्याची झडती घेतली असता एका प्लॅस्टिकच्या सफेद रंगाच्या पिशवीत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे तसेच एक मोबाईल फोन व भारतीय चलनातील १०० रु. व ५० रु. नोटा आढळून आल्या. याप्रकरणी त्याच्याकडून एकूण २६,७५०/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी विजयसिंग मानसिंग पवार व क्राईम पी आय नारायण जाधव, पी.एस.आय मोहन कळमकर, पोहवा – राजेंद्र जाधव, पोना – चंद्रकात शिंदे, पोना – प्रशांत वानखेडे, पोशि – सचिन वानखेडे, पो.ना विशाल वाघ यांनी केली आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!