महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील (माजी गृहराज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील (माजी गृहराज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य यांच्या 47व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 12 एप्रिल 2019 रोजी बंटी साहेब प्रेमी गु्रप पुणे (कोल्हापूर) यांच्या उपस्थितीत नचिकेत बालाग्राम, आकुर्डी या आश्रमात असणार्‍या अनाथ मुलांना वही व पेन देऊन वाढदिवस साजरा केला.
सचिन पाटील यांनी मुलांना आरोग्य विषयक व शिक्षणाविषयक माहिती सांगून सध्याच्या युगामध्ये मुलांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे याचा संदेश दिला.
यावेळी बंटी साहेब प्रेमी ग्रुपचे अमर बरगुडे, अभिजित बिरंगे, राजेश पाटील, दिपक शिंदे, निलेश चौगुले, बाबा जाधव, हर्षद कांबळे, शशिकांत रोकडे, प्रतिक चौगुले, पांडूरंग पवार, विजय पाटील, प्रशांत पाटील, बाजीराव आंबूसकर, एकनाथ पडवळ उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!