ठाणे

मतदार जनजागृतीसाठी अशोक भोईर डिस्ट्रिक्ट आयकॉन

ठाणे :  लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी  अशोक तुकाराम भोईर यांची डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी नेमणूक केली आहे.

उंबर्डे ता. कल्याण येथील रहिवासी असलेले  अशोक भोईर हे  राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे संचालक, दिव्यांग जिल्हा नियंत्रण समितीचे सदस्य,  नेपाळ येथील पॅरा ऑलिम्पिक2018 चे सुवर्ण पदक विजेते असून अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष आहेत. दिव्यांग व्यक्तिंमध्ये मतदानासंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्याच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!