ठाणे

मतदानासाठी पगारी सुट्टी

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता ठाणे जिल्ह्यात सोमवार दि.29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने,आस्थापना कारखाने येथील कामगार,कर्मचारी व अधिकारी यांना पगारी सुटृी देण्यात येत आहे.

या मतदानासाठीच्या सुट्टीच्या दिवसाचा पगार कपात करण्यात येवू नये.अत्यावश्यक सेवा दुकाने व आस्थापना वगळून सर्व  आस्थापना मतदानाच्या दिवशी सकाळी 7 तेसायंकाळी 6 या वेळात बंद ठेवण्यात याव्यात,असे आवाहन कामगार उप आयुक्त ठाणे यांनी केले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादीना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र,त्याबाबत संबंधित आस्थापनांनी महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल,याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल. संबंधित नियोक्त्यांनी,मालकांनी,व्यवस्थापकांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन करावे, याबाबत कामगार किंवा कामगार संघटनांच्या तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित उप आयुक्त यांचे कार्यालयाशी किंवा उप संचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय,ठाणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास सदर आस्थापनोविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंमर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखान्यांच्या मालकांनी,व्यवस्थापनांनी मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सूचनांचे योग्य रित्या पालन करण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन कामगार उप आयुक्त,ठाणे यांचेमार्फत करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!