ठाणे

मतदार जनजागृतीसाठी धावले ठाणेकर

ठाणे :  लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज मतदार जनजागृती दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये जनजागृती केली.

येथील कोर्ट नाका परिसरात सकाळी सात वाजल्यापासून ही दौड आयोजित करण्यात आली होती.सकाळपासून मोठ्या उत्साहात प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, तसेच धावपटू मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्रम नोडल अधिकारी रेवती गायकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व सहभागी धावपटूंना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शुभेच्छा देऊन मतदान जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानंतर रंगित फुगे हवेत सोडण्यात आले व झेंडा दाखवून दौड सुरु करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय, जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, 3 प्रेट्रोल पंप,  साईबाबा मंदिर,  घंटाली मंदिर,  सत्यम कलेक्शन, राममारुती रोड,  न्यू इंग्लिश स्कूल, पी.एन. गाडगीळ- गडकरी रंगायतन मार्गे परत दगडी शाळा, जांभळी नाका, भवानी चौक ते पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन या स्पर्धेचा समारोप झाला.

धावून आलेल्या धावकांचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्वतः पदक देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व सहभागी धावपटूंना अल्पोपहार देऊन नंतर या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!