ठाणे

मोदी लाट ओसरली असल्याने परिवर्तन होणार…महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील

डोंबिवली : २०१४ साली मोदी लाटेत अनेकजन निवडणुकीत विजयी झाले. मात्र  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट ओसरली असल्याने परिवर्तन होणार आहे.कल्याण लोकसभा मतदार संघात आता जनता महायुतीकडे नव्हे तर महाआघाडीकडे पाहत आहेत. त्यामुळे आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेचा कौल मिळणार आहे. ते `तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे` असा एका चित्रपटातील डायलॉग  महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.

   महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आगरी कोळी महासंघ,अमन समाज पार्टी,आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ, मसीहा संघटना, रीपाई ( गवई गट ),लाल बावटा रिक्षा युनियन, महाराष्ट्र परिवर्तन सेना,दलित महासंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, घर कामगार आणि पथविक्रेता संघटना या संघटनेने यावेळी पाठिंबा दिला. तसेच यावेळी पाठिंबा दिलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थोडक्यात आपली मते मांडली.यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे, आगरी कोळी महासंघ अध्यक्ष अॅड. भारतद्वाज चौधरी कार्याध्यक्ष गजाजन पाटील,  लाल बावटा रिक्षा युनियन अध्यक्ष काळू कोमास्कर, घर कामगार आणि पथविक्रेता संघटनेच्या अध्यक्षा मधु बीरमोळे, अमन समाज पार्टीचे निसार शेख, रीपाई ( गवई गट )चे किशोर कांबळे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे नागनाथ वाघमारे, दलित महासंघाचे अध्यक्ष सचिन लोंडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीकांत कांबळे, आदी उपस्थित होते.पुढे महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी म्हणाले, गेल्या वर्षात कल्याण लोकसभा मतदार संघात विकास झाला नाही. नेवाळी गाव आंदोलन,पाणी प्रश्न, रेल्वे स्थानकात सुविधांचा वणवा, डंपिंग ग्राउंड,वाहतुक वाढती या अश्या अनेक समस्या अद्याप सुटल्या नाहीत.आता मोदी लाट ओसरली असून जनतेला परिवर्तन हवे आहे.मनसे आमच्या बरोबर असल्याने त्यांची मते हि मलाच मिळणार हे नक्की. भूमिपुत्रांनी न्याय हक्कासाठी निवडणून दिले परंतु त्यांच्या समस्या सोडविल्या नाहीत.पालिकेचे रुग्णालयगरोदर महिलांना या रुग्णालयात प्रवेश मिळत नाही.मुंब्रा रेतीबंदर विभागात रेल्वे ओलांडण्याची सोय नसल्याने निष्पाप बळी जात आहेत. युती सरकारच्या काळात दलित आणि शेतकऱ्यांवर अन्यायाची संख्या वाढत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

Advertisements

मुंबई

कोकण

error: Content is protected !!