पालघर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे, पालघर जिल्ह्यातील, वसई तालुका शाखेच्या वतीने रविवार दि. २१ एप्रिल रोजी भाऊसाहेब वर्तक सभाग्रह, विरार येथे राज्यस्तरीय खुले कविसंमेलन संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक व कवी डाॕ. अ. ना. रसनकुटे, पालघर जिल्हा अध्यक्ष व प्रा. डाॕ. धर्माजी खरात, सिनेट व कवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मुख्य अतिथी सौ. नम्रता माळी-पाटील तर विशेष अतिथि म्हणून लोकशाहीर राजरत्न राजगुरू उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून कविसंमेलनास सुरूवात झाली.
डाॕ. के. डी. संखे, डाॕ. अनुपमा जाधव, किशोर पवार, मधुकर तराळे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कवी विजय पुरव, संजय पाटील, अॕड. नयन जैन, डाॕ. प्रशांत पाटील, अॅड. नेहा धारूलकर, संगिता पाध्ये, सुरेखा कुरकुरे, योगेश गोतारणे, मकरंद वांगणेकर, शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, राजेश साबळे, संतोष खाडे, अनिल सांगळे, संतोष मोहिते, समीर बने, वैभवी गावडे, संध्या पालव, शारदा खांदारे, शीतल मालुसरे, गुरुदत्त वाकदेकर आदि कवीनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.
पालघर जिल्हा अध्यक्षांनी आपल्या भाषणात संबधित संस्थेची थोडक्यात माहिती उपस्थितांना करुन तीन दगडाची चूल ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन शिल्पा परूळेकर यांनी केले. या कविसंमेलनाला ७५हून अधिक कवी उपस्थित होते. या सर्वानी आपल्या कविता सादर केल्यावर मान्यवरांच्या
हस्ते त्याना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देण्यात आले.