गुन्हे वृत्त

क्रिम बिस्किटातून गुंगीचे औधष देऊन रेल्वे प्रवाशाला लुटणाऱ्या “बंटी-बबली”ला ठोकल्या बेड्या

लोहमार्ग गुन्हे शाखा 3 व आरपीएफ पोलिसांची उत्तम कारवाई
मुंबई :  क्रिम बिस्किटातून रेल्वे प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन रोकड, सोन्याचा ऐवज व एटीएम कार्ड चोरणाऱ्या “बंटी-बबली”ला लोहमार्ग गुन्हे शाखा 3 व आरपीएफच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या दुकलीने प्रवाशाच्या एटीएम कार्डद्वारे रोख रक्कम काढली होती. तसेच एटीएम कार्ड स्वाईप करून सोन्याचे मंगळसूत्र विकत घेऊन एकूण 1 लाख 21 हजार 538 रुपयांची चोरी केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरुद्ध मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात सन 2012 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता, हे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
   17 एप्रिल 2019 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर लोकलची वाट पाहत बसला होता. त्यावेळी एक महिला तेथे आली. त्या महिलेने प्रवाशासोबत संवाद साधला. कोठे जायचे आहे ? , काय काम करता ? अशी वैयक्तिक माहिती काढूऩ प्रवाशाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनी एकमेकांना स्वत:चे मोबाईल नंबर दिले. महिलेच्या गोड बोलण्यात अडकलेला प्रवासी दुसऱ्या दिवशी तिला भेटण्यास पुन्हा कल्याण स्थानकात गेला. त्यावेळी महिलेने त्याला गुंगीचे औषध मिश्रित क्रिम बिस्कीट खाण्यासाठी दिले. बिस्किट खालल्याने त्या इसमाला गुंगी येऊ लागली. हीच संधी साधून महिलेने घरी सोडते, असे सांगून त्या इसमाला रेल्वेने कोपर स्थानकात आणले. तेथे महिलेने व तिच्या साथीदाराने इसमाच्या खिशातील पाकीट, सोन्याचा ऐवज, मोबाईल काढून पळ काढला.
     दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर त्या इसमाने तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी (गु. र. क्र. 1282/19) भादंवि कलम 328, 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास लोहमार्ग गुन्हे शाखा 3 चे पथक करू लागले. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोरटी (बंटी-बबली) महिला व तिच्या साथीदाराचा चेहरा स्पष्ट दिसून आला. त्या फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना खबऱ्याने तपासी पथकाला माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिवा येथे सापळा लावून सरला रमेश सदांनशिव ऊर्फ सरला सोनराज एळंजे (30), नदीम आले मोहम्मद सय्यद ऊर्फ आब्बास (32) यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींकडून 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी प्रवाशाच्या एटीएम कार्डद्वारे मुंब्रा रेल्वे स्थानकालगत असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढले व एका ज्वेलर्स दुकानात एटीएम कार्ड स्वाईप करून मंगळसूत्र विकत घेतल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.
     या चोरट्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज या आरोपींनी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
     या गुन्ह्याचा उलघडा मुंबई लोहमार्गचे आयुक्त निकेत कौशिक, लोहमार्ग मध्य परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, लोहमार्ग गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, आरपीएफ निरीक्षक अतुल क्षीरसागर, अजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मतकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, हवालदार विजय पवार, पोलीस नाईक रणजीत रासकर, पोलीस नाईक गणेश गावडे, पोलीस नाईक दिलीप शेळके, पोलीस शिपाई महेंद्र कर्डिले, पोलीस शिपाई वैभव जाधव, पोलीस शिपाई सचिन खंडागळे, महिला पोलीस शिपाई विद्या सानप, महिला पोलीस शिपाई मिनल गुरव, आरपीएफ आरक्षक विशाल कवळे, गोपालघरे भागवत, रोशन राजपूत, विनोद सुरडकर आदी पथकाने केला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!