पुणे : धरण परिसरात सहलीसाठी आलेले भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना आज सकाळी घडली. मुळशी तालुक्यातील वळणे गावात ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बुडालेल्यांपैकी एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर दोघांचा शोध सुरु आहे.
संगीता नेगी (कोथरुड, मुळ दिल्ली), शुभम राज सिन्हा (वय. २२, मुळ पटना बिहार), शिवकुमार (वय २१, रा. मुळ उत्तरप्रदेश) अशी तिघांची नावे आहेत.