ठाणे

कानवी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी कु.गणेश धोंडू चौधरींची लघुपाटबंधारे विभागाकडे मागणी..

शहापूर : मुंबई ठाण्याची तहान भागवणारी मोठं मोठी धरणे तालुक्यात असतांना सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शहापूर तालुक्यात निर्माण झाली. पोटाची तहान भागवण्यासाठी चिमूटभर पाण्यासाठी पाण्यासाठी आज महिलांना मैलोनमैल जाऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागते तेव्हा कुठे कळशीभर पाणी मिळते. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता अन पाण्याअभावी गुराढोरांना आपला प्राण गमवावा लागतोय.

आज खर पाहता परटोली, कानवे आणि चेरवली जवळून पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या कानवी नदीने सुद्धा एप्रिल महिन्यातच तळ गाठला आहे. या नदीपात्राच्या परिसरातील शेकडो शेतकरी बांधव उदरनिर्वाहासाठी उन्हाळ्यात फळभाज्या लागवड करत असतात दरवर्षी शेतकरी बांधवाना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असतो. पाण्याअभावी फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी बांधवांना याचा फटका मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय.
कानवी नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या सर्व बंधाऱ्यांच्या खोऱ्यात पावसाळी दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर दगड गोटे, रेती, माती अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने तो गाळ बंधाऱ्यामुळे अडला जातोय परिणाम बंधाऱ्याच्या खोऱ्यात गाळ साचल्याने उन्हाळ्यात फार कमीप्रमाणत पाणी साठा होतो. हा पाणीसाठा उन्हाळ्यात मार्च महिन्याच्यात शेवटच्या आठवड्यात आटला जातोय परिणामी अपुऱ्यापाण्याअभावी फळभाज्या करपून जाऊन याचा सर्वात मोठा फटका हा कानवी नदी परिसरात फळभाज्या लागवड करणाऱ्या शेकडो शेतकरी बांधवांना बसतोय. परिसरातील गुराढोरांना पिण्यासाठी पाणी नसल्याने तसेच महिला भगिनींना कपडे व धुणीभांडी करण्यासाठी नदीपात्रात पाणी नसल्याने मोठ्याप्रमाणात हेळसांड होते.
कानवी नदीपात्रातील पाणीसाठा वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना, महिला भगिनींना तसेच गुराढोरांना दिलासा मिळाला म्हणून कानवी नदीपात्रातील गाळ व मोठमोठे दगड धोंडे नदीपात्रातून काढून बंधारा परिसरातील भाग हा ज्याप्रमाणे आपण जमीन नांगरणी करतो त्याप्रमाणे तेथील परिसराची सुद्धा नांगरणी करावी त्यामुळे पाणी जमिनीत मुरल्याने भूजल पातळी वाढ व्हावी तसेच गाळ काढल्याने व मोठं मोठे दगड धोंडे काढल्याने नदीपात्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढावा आणि उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी  धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे शहापूर तालुका सचिव कु.गणेश धोंडू चौधरी यांनी लघुपाटबंधारे विभाग शहापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!