ठाणे

सेलिब्रेटीपेक्षा रिक्षाचालकच खरे स्वच्छतादूत : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे :  सेलिब्रेटीपेक्षा शहरातील नागरिकांना सेवा देणारे रिक्षाचालकच खरे स्वच्छतादूत असून ’थुंकू नका आणि थुंकू देऊ नका’ या संदेश ठाण्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत हे स्वच्छतादूत नक्की पोहचवतील असा विश्वास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज व्यक्त केला.ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक वाहतूक विभाग, गुन्हे शाखा , रोटरी क्लब व ठाणे शहरातील डॉक्टर्स यांच्या सहकार्याने ठाण्यात राबविण्यात येणाऱ्या ‘’थुंकू नका आणि थुंकू देऊ नका’ या विशेष मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास १२०० हुन अधिक रिक्षाचालकांसह सफाई कामगारांनी सहभाग घेतला.

यावेळी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त(1) राजेंद्र अहिवर,वाहतूक शाखेचे जितेंद्र पाटील, श्याम लोही, दै.वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, कामगार युनियनचे अध्यक्ष रवी राव,संतोष कदम, डॉ. तुषार सहत्रबुद्धे, खुशबू टॉरि,शशांक पवार आदी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, रोटरी क्लब व ठाणे शहरातील डॉक्टर्स यांच्या सहकार्याने ठाणे शहरात ही स्वच्छेतेची मोहीम राबविण्यात येणार असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनें या मोहिमेत सहभागी होवून ही एक लोकचळवळ निर्माण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.नार्वेकर यांनी यावेळी केले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!