साहित्य

साहित्यसंध्या, मुंबई यांच्या तर्फे साहित्य सेवेसाठी गुरुदत्त वाकदेकर यांना “साहित्य भूषण” तसेच हरिश्चंद्र धिवार यांना “समाज रत्न” पुरस्कार प्रदान

मुंबई  :  “साहित्यसंध्या, मुंबई” आयोजित ११७व्या कविसंमेलनात निमंत्रित साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ह्या काव्यजल्लोषात रसिकांना दर्जेदार कवितांचा आस्वाद घेता आला. सुप्रसिद्ध साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर ह्यांना ह्या कार्यक्रमा दरम्यान “साहित्य भूषण” तसेच सुप्रसिद्ध लोककवी व समाजसेवक हरिश्चंद्र धिवार यांना “समाज रत्न” सन्मानाने अध्यक्ष विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष रविकिरण पराडकर, कार्यवाह सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. तसेच अरविंद देशपांडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन साहित्यसेवेद्दल अशोक महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

तत्पूर्वी अरविंद देशपाडे, स्वाती शृंगारपुरे, सुरेश कुलकर्णी, रविकिरण पराडकर, विठ्ठल पाटील, अशोक कांबळे, राजेश मेस्त्री, प्रदीप पवार, अशोक महाजन, हरिश्चंद्र धिवार, विजय ढोकळे, सुरेखा गायकवाड, कल्पना म्हापुसकर, संतोष मोहिते, शारदा खांदारे, सुनिता काटकर, विजय म्हामूणकर, सुधा गोखले, प्रदिप मेहेंदळे, अनंत जोशी, सदा बाभुळकर, शामराव सुतार, डाॅ. आर. एल. वर्मा, लहू पाताडे, मंगला उदामले, गुरुदत्त वाकदेकर आदी मान्यवरांनी स्वलिखित कविता सादर करुन कार्यक्रमाचा आलेख सतत उंचावत ठेवला. सुनिता काटकर ह्यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.

“साहित्यसंध्या, मुंबई” चे विठ्ठल पाटील, रविकिरण पराडकर, सुरेश कुलकर्णी यांच्या समवेत अशोक कांबळे, मंगला उदामले, राजेश मेस्त्री, विजय ढोकळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!