ठाणे

डोंबिवलीतील नांदवली स्वामी समर्थ मठाजवळ दोन  मजली अनधिकृत इमारतीवर हातोडा..  

डोंबिवली :   कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या ‘इ`प्रभागातील स्वामी समर्थ मठाजवळ असलेल्या अनधिकृत बालाजी संकुलाच्या दोन इमारतीवर मंगळवारी दुपारच्या दरम्यान पालिकेने हातोडा मारला. तळ अधिक दोन मजले रिकामे असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. यामुळे वरच्या मजल्यावर रहाणारे रहिवासी घाबरून खाली आले.
कोणतीही पूर्व सूचना न देता  पालिका प्रशासन २ पोकलेन मशीन, ३ जेसीबी ,प्रभाग अधिकारी व पोलीस असा प्रचंड फौजफाटा घेऊन प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड बालाजी इमार्ततिजवल आले एक व दोन आशा या इमारतीत सुमारे १००  कुटुंबे रहात होते. आयत्या वेळेस तिसरी नोटीस देऊन व ती दारावर लावण्यात आल्याची तक्रार महिला करत होत्या. घर घेताना सर्व कागदपत्र दाखवली म्हणून आम्ही घर घेतले, आता मात्र बिल्डर लपून बसल्याची तक्रार महिला करत होत्या. पालिकेने सात मजली इमारतीतील गाळे व दोन मजले रिकामे करून तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यामुळे रहिवासी रहात होते तो भाग जेसीबी व पोकलनच्या दणक्याने हादरून गेला व घबराट निर्माण झाली. पालिकेची कारवाई अन्यायाची असून बिल्डरने आमची फसवणूक केली आता आम्ही जायचं कुठे असा आक्रोश रहिवासी करत होते. या संदर्भात प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड यांना विचारले असता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करत असल्याचे सांगितले ४  प्रभाग अधिकारी ,२  पोकलन्ड ,३  जेसीबी मशीन ,पोलीस व इतर कर्मचारी असा मोठा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता डी पी रस्त्याच्या मध्ये या इमारती वर्गीस म्हात्रे या बांधकाम व्यावसायिकाने बांधल्याचे त्यांनी सांगितले. खास सूत्रांच्या माहितीनुसार पालिकेतील एक निलंबित अधिकारी व एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संघर्षात नागरिकांचा बळी घेण्यात आल्याचे समजते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!