विश्व

शेतकऱ्याच्या पत्नीला डोंबिवलीकरांचा `आधार`… डोंबिवलीतील प्रथमच आंबा महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते…

 डोंबिवली : ( शंकर जाधव  ) भारत देश कृषीप्रधान असला तरी आज शेतकऱ्याची परिस्थिती हलाखिची झाली आहे. अश्या एका शेतकरी कुटुंबातील पतीचा आधार गमावलेल्या अलका पाडळे यांनी न खचता आपल्या शेतातील शेतमाल डोंबिवलीच्या आंबा महोत्सवात विक्रीस आणला आहे. येथील विविध प्रकारच्या शेतमालाच्या विक्रीला डोंबिवलीकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थेट ग्राहकापर्यत शेतमाल देण्याच्या तिच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. आज डोंबिवलीतील आंबा महोत्सवात अलका पाडळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपल्या जीवनात संघर्ष करताना समाजाकडून अश्या प्रकारे आपल्याला असा मान मिळाल्याने उद्घाटनप्रसगी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

डोंबिवली पूर्वेकडील आनंद बालभवन येथील ज्ञानेश्वर मठ मैदानात गुरुवारपासून भव्य आंबा महोत्सव सुरु झाला आहे. ९ ते १९ मे पर्यत सुरु असलेल्या या महोत्सवात डोंबिवली फेस्टिवल २०१९ असून आयोजन भाई पानवडीकर केले आहेत. तर या महोत्सवाला पेसमेकर अॅकॅडमीने सपोर्ट केले आहे.शेतकरी ते ग्राहक असा एक स्टाॅल असल्याचे आयोजक पानवडीकर यांनी सांगितले. या महोत्सवात सातारा येथील अलका पाडळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात विविध खाद्यपदार्थाचे स्टाॅल लावलेल्या महिलांनी पाडळे यांचे कौतुक केले. इंद्रायणी, बासमती, कोलम, तांदूळ व कडधान्य विक्री आणले आहेत. पूजा देवकर या ग्राहकाने पाडळे यांच्याकडून तांदूळ विकत घेतले.यावेळी पाडळे म्हणाल्या, मी डोंबिवलीत दरवर्षी तांदूळ विक्रीसाठी ये असते.डोंबिवलीतील शेतमाला चांगला भाव मिळतो. पतीच्या निधनानंतर आपल्या कुटुंबासाठी मी हे सर्व सांभाळू शकते ते नागरिकांच्या सहकार्याने शक्य झाले.या महोत्सवात अन्नपूर्णा आंबा विक्री केंद्र, रत्नागिरी हापूस आंबा, देवगड हापूस आंबा याचे स्टाॅल आहेत. तर महिलांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टाॅल आहेत. दरम्यान डोंबिवलीत प्रथमच शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!