ठाणे

आंब्याच्या स्टॉल लावण्यावरून मनसे व भाजपचा राडा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. नुकत्याच ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता.  मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी मनसेतर्फे काही वेळ रस्ता रोकोही करण्यात आला.
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणच्या लोकसभा जागांवरील मतदान पार पडलं. मतदानानंतर सर्वत्र राजकीय वातावरण शांत असताना ठाण्यात आज अचानक मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
ठाण्यातील नौपाडा येथे शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमातंर्गत मनसेतर्फे एका शेतकऱ्याने रस्त्यावर आंब्याचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. त्यामुळे हा आंब्याचा स्टॉल लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र या स्टॉलच्या शेजारी असलेल्या अनधिकृत गाळा आधी हटवा, नंतर आम्ही आंब्याचा स्टॉल हटवतो अशी भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
यानंतर भाजपने मनसेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत राज ठाकरे हाय हायच्या घोषणा दिला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर हे अस म्हणतं भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणानंतर ठाणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!