ठाणे

दिवा पूर्वेकडील मुंब्रा देवी काँलनी रोडवर पुन्हा अपघात

ठाणे : दिवा पूर्वेकडील मुंब्रा देवी कॉलोनी रोडवर अपघाताचे सत्र थांबता थांबेना, काल रात्रि ८ वाजता मुंब्रादेवी हॉस्पिटल जवळ दुचाकीस्वाराने रुख्मीणी नांगरे या व्रुध महिलेला उडवले. कॉलोनीरोडवर नवीन झालेल्या रस्त्यावर दुचाकी व रिक्षा भरधाव वेगाने धावत आसतात त्यातच स्पीडब्रेकरचा अभाव असल्याने अपघात होत आहेत.सदर व्रूध महिला सायली बिल्डिंग२ मध्ये B-403 विंगमध्ये ४ थ्या मजल्यावर राहणारी असून प्रक्रुती चिंताजनक असून लेकसिटी हॉस्पिटल , क्यड्बरी कंपनी ठाणे येथे उपचार सुरु आहेत. सदर आपघात प्रकरणी प्रशासन कधी पावले उचलणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.फुटपाथ तयार असून त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे परिणामी सर्वसामान्य जनतेला रस्त्यातूनच जिवमुठीत ठेऊन चालावे लागते. त्यामुळे हे अपघात होत आहेत.फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी व स्पीडब्रेकर टाकण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.प्रकरणी मुंब्रा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा क्र 304 / 2019 नुसार कलम 279,337,338 व 184 नुसार दुचाकीचालक प्रदीप यादव यांस पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!