ठाणे

रिक्षा अपघातातील ‘त्या’ महिलेचा अखेर मृत्यू

ठाणे ः  दिवा पूर्वेकडील मुंब्रादेवी कॉलोनी रोडवर मुंब्रादेवी हॉस्पिटल जवळ दुचाकीस्वाराने उडवलेल्या श्रीमती रुख्मीणी नांगरे या महिलेचा आज म्रूत्यू झाला. कॉलोनीरोडवर नवीन झालेल्या रस्त्यावर दुचाकी व रिक्षा भरधाव वेगाने धावत आसतात त्यातच स्पीडब्रेकरचा आभाव असल्याने सदर महीला आपघाताची बळी पडली . सदर व्रूध महिला सायली बिल्डिंग२ मध्ये B-403 विंगमध्ये ४ थ्या मजल्यावर राहणारी होती. गेली चार दिवसापासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सदर आपघात प्रकरणी प्रशासन आणि किती बळी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.फुटपाथ तयार असून त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे परिणामी सर्वसामान्य जनतेला रस्त्यातूनच जिवमुठीत ठेऊन चालावे लागते. त्यामुळे हे आपघात होत आहेत.फेरीवाल्यांना हटवण्याची व स्पीडब्रेकर टाकण्याबाबत स्थानिक लोकांची मागणी असून लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन कधी जागे होणार. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!