गुन्हे वृत्त

खर्चाला कमी पैसे देण्याच्या रागातून मुलाने केली पित्याची निर्घुण हत्या…

 डोंबिवली : ( शंकर जाधव   )खर्चाला कमी पैसे देत असल्याच्या रागातून मुलाने पित्याची निर्घुण हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोडवरील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या समोरील सुदामा कान्हा म्हात्रे इमारतीत ही घटना घडली. विष्णूनगर पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोडवरील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या समोरील सुदामा कान्हा म्हात्रे इमारतीत सुभाषचंद्र कल्याण हरके ( ७० ) हे मुलगा अरविंदबरोबर राहत होते.वडील सुभाषचंद्र कल्याण हरके हे नातेवाईकांना खर्चाला पैसे देत होते.मात्र खर्चाला कमी पैसे देत असल्याचा राग अरविंदच्या मनात खदखदत होता.अखेर मंगळवारी पाहटेच्या सुमारास दोघांमध्ये या कारणावरून जोरदार भांडण झाले.संतापलेल्या अरविंदने घरातील कैचीने सुभाषचंद्र हरकेंच्या मानेवर वार करत डोक्यात हतोड्याने प्रहार केला.यात सुभाषचंद्र हरके जागीच मरण पावले. याच इमारतीत हरके यांचे नातेवाईक राहतात. त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी विष्णूनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हत्या करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास बी.एस. पवार करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!