ठाणे

ठाणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती यायला लागणार किमान १२ तास

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती यायला साधारणत: १२ तास लागतील अशी माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

                मतमोजणी प्रक्रिया, सज्जता आणि व्यवस्थेविषयी माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली. मतमोजणीच्या दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असून मतमोजणीच्या आत आणि बाहेर निवडणूक आयोगाच्या नियम आणि सूचनांचं काटेकोर पालन केलं जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल फोन नेता येणार नाहीत. यातून निवडणूक लढवणारे उमेदवारही सुटले नसून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना संपर्कासाठी एक कक्ष तयार करण्यात आला असून तिथेच मोबाईल वापरता येणार आहे असं पवार यांनी सांगितलं. मतमोजणीसाठी साधारणत: १ हजार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी आणि इतर व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यासाठीही जवळपास हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचं पवार यांनी सांगितलं.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!