मुंबई

माजी विद्यार्थ्यांचे स्वयंप्रेरित सामाजिक व शैक्षणिक जनजागृती शिबीर…..

आली आली शिक्षणाची गाडी आली
मुंबई : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थ्यानी स्थापन केलेल्या “जाणीव” या माजी स्वयंसेवक संस्थेच्या स्वयंप्रेरणेने एका सामाजिक व शैक्षणिक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संस्थेचे पदधिकारी बंसिधर धुरंधर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात “शिक्षणाची गाडी आली” या उपक्रमांतर्गत मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून वही, पेन, पेन्सिल, रबर, चित्रकला वही अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच आदिवासी पाड्यांमध्ये पथनाट्य, गीते, सांस्कृतिक कार्यक्रम, पदभ्रमण व खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता व आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षणाचे महत्व, चित्रकला – हस्तकला व शिक्षणाचा खरा आनंद या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्यातील भारोळ येथे दिनांक १७ ते २९ मे, २०१९ अशा तीन दिवस चाललेल्या या शिबिरात श्रमसंस्काराच्या माध्यमातून वृक्षरोपनासाठी व जलसंवर्धनासाठी खड्डे करणे व शिक्षणाविषयी जनजागृती करणे हे उपक्रम राबवण्यात आले. या शिबिरात महाविद्यालयातील रासेयोचे तब्बल 100 हून अधिक आजी – माजी स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी पाड्यावरील लोकांसोबत आदिवासी सांस्कृतिक कलेतील तारफा नृत्याचा आनंद घेतला. तसेच शिबिराचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले असून याचे आर्थिक नियोजन देखील त्यांनीच केले होते. त्याचसोबत लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मूलन संस्था, वसई, साईन पोस्ट इंडिया तर्फे शैक्षणिक साहित्य, जाणीव एक सामाजिक संस्था यांच्या आर्थिक सहाय्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले. तसेच जिल्हा परिषद शाळा भारोळ यांच्या पाठिंब्यामुळे आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व वाढावे यासाठी आजी – माजी विद्यार्थ्यांच्या स्वयंप्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या आजी माजी कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वी झाले. अशी माहिती साठ्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी नुपूर गोसावी यांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!