ठाणे

गार्डीयन कॉलेज मधील विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी

कल्याण :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.यंदा बारावीचा निकाल ८५.८८ टक्के लागला आहे.ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहराबरोबर शैक्षणिक स्थरावर ही प्रगती पथावर सर्वात पुढे आहे.डोंबिवली शहराची सांस्कृतिक,शैक्षणिक प्रगतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.

नुकतेच सिबीएससी आणि आयसीएसईच्या बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला होता.डोंबिवलीतील ओमकार स्कुल आणि गार्डीयन स्कुलच्या विध्यार्थ्यांनी शंभर नंबरी यश मिळविल्याचे सिद्ध झाले होते. आता पुन्हा बारावीच्या निकालात डोंबिवली ग्रामीण विभागातील भोपर देसलेपाडा येथील गार्डीयन कॉलेजच्या विध्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत अधिक गुणांचा यश मिळविल्याने शिक्षक व पालकाकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.

डोंबिवली भोपर देसले पाडा या ग्रामीण विभागात असलेल्या गार्डीयन इंग्लिश स्कुल आणि ज्युनियर कॉलेजच्या विध्यार्थ्यांनी ओमकार स्कुलच्या एकूण ९ विध्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत ८५ % पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. आर्ट या विषयात सानिका विजय शेडगे,निषिता उल्हास चिमनकर,ओमकार शरद म्हात्रे यांनी जास्त गुणांचा यश मिळविले आहे.तसेच सायन्स विषयात सुमित रणजित सिंग,मनीष मनोजप्रसाद मेहता,विशालकुमार नवीन सिंग या विध्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.कॉमर्स या विषयात सिद्दी जिटेश माळी,ऐश्वर्या संपत कदम,विघ्नेश्वराज सुब्रमण्यम पिल्लाई यांनी यश मिळविल्याने त्यांचे फार कौतुक केले जात आहे.
गार्डियन स्कुल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सिंधू हेमंत ,समनव्यक शोभना नायर,समुपदेशक उषा बोरसे,समता डहाणूकर,संध्यारणी माडभगत,अमृता नाईक,तसेच सायली सारंगधर,प्रिया पतंगे सुजाता ओझाला ह्या शिक्षिका तसेच पितांबर जडे सर,सुविधा,अस्मिता,रोशनी भक्ती या सर्व टीम वर्कनी या बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी फार परिश्रम घेऊन,त्यांना बारावी परीक्षेत यश मिळविण्यासाठी सहकार्य केले आहे…

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!