भारत

मोदी सरकारचा पहिला निर्णय – आता दरवर्षी सर्व शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळाची दुसरी इनिंग धडाक्यात सुरू केली आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळाची दुसरी इनिंग धडाक्यात सुरू केली आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी पेन्शनयोजना सुरू करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लागू होती. मात्र भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात ही योजना सर्व शेतकऱ्यांना लागू करण्याची घोषणा केली होती. त्यावर आज झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. आजच्या या घोषणेमुळे या योजनेचा देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याची मोदींनी घोषणा केली होती. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल हे मोदींनी आधीच स्पष्ट केलं आहे. पीएम शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ३ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना पैसा वितरीत करण्यात आला आहे. आतापर्यंत १२.५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केवळ २ कोटी शेतकरी या लाभापासून वंचित होते. आता या सर्व शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर आधी ७५ हजार कोटी रुपये खर्च होत होता, आता त्यावर १२ हजार कोटी अधिक खर्च वाढेल. म्हणजे आता हा एकूण खर्च ८७ हजार कोटी एवढा होणार आहे, असं तोमर यांनी स्पष्ट केलं.

यावेळी तोमर यांनी शेतकरी आणि लघू उद्योजकांसाठी पेन्शन योजनाही घोषित केली. या योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्ष वयाच्या शेतकरी आणि लघू उद्योजकांना वयाच्या ६० व्या वर्षी दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेअंतर्गत १० हजार कोटींचा खर्च येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला दर महिन्याला केवळ ५५ रुपये भरावे लागणार आहे. सरकारही तेवढेच पैसे त्याच्या खात्यात जमा करणार आहे. शिवाय वयानुसार ही रक्कम वाढेल, असं तोमर यांनी सांगितलं. या योजनेमुळे शेतकरी आणि लघू उद्योजकांना निवृत्तीनंतरचं संरक्षण मिळेल. या योजनेचा १२ ते १३ कोटी लोकांना लाभ होईल. पहिल्या टप्प्यात ५ कोटी लोकांना कव्हर करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

योजनेचा ‘कसा’ लाभ घ्याल!

मोदी सरकारनं यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत. शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत मिळतील. त्यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी लागेल. तलाठ्याकडे असलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करावे.

कोणती कागदपत्रे आवश्यक:

>> आधार कार्ड (नसेल तर मतदान ओळखपत्र)

>> बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स

काय काळजी घ्याल?

>> जे बँक खाते सुरू आहे (आयएफएससी कोड असेल) अशा पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.
>> ग्राम समितीकडून चुकून नाव न आल्यास तालुका समितीकडे अर्ज करता येईल.
>> ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यांनीच ही कागदपत्रे जमा करावीत. ज्यांनी यापूर्वी माहिती दिली आहे, त्यांनी पुन्हा माहिती देण्याची आवश्यकता नाही.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!