ठाणे

३२ वर्षापासून पोषण आहारापासून पालिकेतील विद्यार्थी वंचित

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागत आहे.डोंबिवितील पालिकेच्या हिंदी माध्यामिक शाळेत ३२ वर्षापासून पोषण आहार मिळत नसल्याची धक्कादायक वास्तविकता समोर आली आहे.याबाबत शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्गाने शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केले होते. मात्र सरकारी भाषेत उत्तरे देऊन शिक्षण विभागाने याकडे पाठ दाखवली.

डोंबिवली पूर्वेकडील पालिकेच्या विभागीय कार्यालयाजवळ गेली अनेक वर्षापासून पलिकेची हिंदी माध्यमिक शाळा आहे.या शाळेत इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीत असे एकूण २०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिकतात. शासनाच्या नियमानुसार पालिकेच्या शाळेतील  विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे आवश्यक असते. मात्र पालिकेने दुर्लक्षित कारभाराचा पुरावा देत हिंदी माध्यमिक   शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिले नाही. १९८७ पासून ते २०१९ असे एकूण ३२ वर्ष या शाळेत पोषण आहार देण्यात आला नाही.ही शाळा पालिकेकडे ३० वर्ष असून गेल्या वर्षी ही शाळा शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आली. या शाळेतील शिक्षकांचा पगार पालिका प्रशासनाकडून दिला जात असला तरी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यास पालिका प्रशासनाने पाठ दाखविली. मात्र ही शाळा शिक्षण विभागाकडे वर्ग झाल्याने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे आवश्यक होते.त्यामुळे या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित  ठेवणाऱ्या जबाबदार संबंधित विभागातील अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी जे.जे.तडवी यांना नवनियुक्त शिक्षण समिती सभापती आणि सदस्यांनी सभेत जाब विचारून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षण समितीवर आजवर शिवसेनेची सत्ता असताना विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याकडे का लक्ष दिले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच या शाळेत फक्त तीन वर्ग असून वर्गात बसण्यास जागा कमी पडल्याने एका बाकावर चार ते पाच विद्यार्थी बसतात. जागा अपुरी असल्याने शाळेला लागून आलेली बंद वर्ग या शाळा देण्यात यावा असे शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. मात्र याकडेही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!