ठाणे

कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात अस्वच्छता गृहाची आणि सतत पाणी गळतीचा व्हिडीओ व्हायरल..

  कल्याण :-    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण येथील आचार्य अत्रे  रंगमंदिर वादाच्या भोवऱ्यात  सापडला आहे.प्रसिद्ध कलाकार आस्ताद काळे याने काढलेला मेकअप रूममधल्या अस्वच्छता गृहाची आणि सतत पाणी गळतीचा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
        रविवारी रात्री `तिला काही सांगायचं` या नाटकाचा प्रयोग लावण्यात आला होता. या प्रयोगादरम्यान मेक अप करण्यासाठी गेलेल्या कलाकार आस्ताद काळे याना नाट्यगृहाची मेकअप रुम आणि व्हीआयपी रुम अतिशय अस्वच्छता  दिसली. आचार्य अत्रे रंगमंदिरातीळ स्वछतागृहात २४ तास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. गेले वर्षभर आचार्य अत्रे रंगमंदिर दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते. या नाट्यगृहाची पालिकेकडून जवळपास १ करोड खर्च करण्यात आला होता. धापा टाकत असलेली नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा, रंगमंदिरातील स्वच्चतागृहातील फुटलेली भांडी,  बेसिनला जोडलेल्या वाहिन्या या सर्व असुविधांमुळे  गेल्या वर्षी या रंगमंदिरातील  `ती फुलराणी`ला प्रयोग प्रेक्षकांनी थांबवला होता. त्यांनंतर नाट्यगृह बंद करून त्याची  एक करोड खर्च करून  डागडुजी करण्यात आली  होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!