ठाणे

डोंबिवलीच्या डॉ. प्रियांका पाटील यांचे एमडी जनरल मेडिसिन परीक्षेत यश

डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव परिसरात राहणाऱ्या एड रोशन पाटील यांच्या पत्नी प्रियांका पाटील यांची नुकतीच झालेली एम डी जनरल मेडिसिन परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण होवून यश संपादन केले ,दहावी बारावी नंतर डी वाय पाटील काँलेज मधून एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी एम डी पदवी साठी तयारी सुरु केली.एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या व संसाराचा गाडा हाकत उच्च शिक्षण घेत वैद्यकीय क्षेत्रात उच्च पदवी घेणाऱ्या प्रियंका याच्या सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .याबाबत प्रियांका यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई वडील ,कुटुंबीय प्राध्यपक वर्ग तसेच महाविद्यालयाला दिले असून पुढील वाटचाल रुग्णसेवा व संशोधन कार्यात सुरु ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली .प्रियंका ने मिळवलेल्या यश बद्दल नशनल कंपनी लो ट्रिब्युनल ज्युडीशियल चे सदस्य मदन गोसावी ,एम रुग्णालयाचे संचालक डॉ शिरोडकर ,ह भ प बाळकृष्ण महाराज आदी मान्यवरांनी डॉ प्रियंका यांचा सत्कार केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!