ठाणे

डोंबिवलीतील रामनगर भागात रात्री आठ तास बत्ती गुल

डोंबिवली :  महावितरण कंपनी डोंबिवलीत वीज पुरवठा अखंडित करण्याची वल्गना करत असली तरी थोडयाशा चुकीमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना डोंबिवलीत घडत आहेत काल रात्री आठ वाजल्यापासून रामनगर भागात पहाटे अडीच तीन पर्यत वीज पुरवठा खंडित झाला होता. रामनगर पेालीस ठाण्याजवळ रस्ता खोदताना मुख्य वीज वाहिनी डॅमेज झाल्याने वीज पुरवठा तब्बल आठ तास खंडित झाला होता. पाऊस नसल्याने नागरिक त्रस्त असताना त्यातच आता वीज नसल्याने नागरिकांनी रात्र जागून काढली. याचा परिणाम येथील पाणी पुरवठयावर झाला आहे.

मंगळवारी  रात्री अचानक रात्री आठ वाजता बाजी प्रभु चौकातील २२ के व्हीच्या मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. रामनगर ,आयरे रोड,राजाजी पथ,म्हात्रे नगर ,कोपर आदि भाग असून सुमारे ५० हजार नागरिकांना खंडित वीज पुरवठयाला तोंड द्यावे लागले. या भागात सुमारे १५ ते १८ हजार वीजग्रहक असल्याचे सांगण्यात आले. मुख्य वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने त्यातील दोष शोधण्यात खूपच विलंब झाला. नक्की दोष शोधण्यासाठी प्रत्येक खांबावर चढून शोध घ्यावा लागत होता. अखेर हा शोध संपला व तात्पुरता वीज पुरवठा सुरु करण्यास पहाटेचे अडीच वाजले. याकाळात नागरिकांनी जागे रहाणे पत्करले. कारण झोप येत नव्हती,नागरिक वीज अधिकाऱ्यांना वीज पुरवठा कधी सुरु होणार हे विचारत होते. तेव्हा ते दरवेळी वेगवेगळी वेळ सांगत होते. अखेर अडीच वाजता वीज पुरवठा सुरु झाला. पण नागरिकांना यामुळे जागरण झाले. अनेंकांनी मग रजा घेऊन घरी आराम करणे पसंत केले.या भागात रात्री व सकाळी पाणी पुरवठा होत असतो.मात्र वीज पुरवठा नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकला नाही.याबाबत कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना विचारले असता ते म्हणाले ,डोंबिवलीतील २२ के व्हीची मुख्य वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने डोंबिवलीच्या रामनगर भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. पहाटे अडीच वाजता तो पूर्ववत करण्यात आला.

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!