डोंबिवली : ( शंकर जाधव ) १० वर्षात पूर्ण झालेला, विना घोटाळा असलेला प्रकल्प दाखवा आणि ५०१ घेवून जा अशी टीका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर मनसेच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. आज डोंबिवली लोकलची पंचवीशी साजरी करताना राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मनसेवर पलटवार केला. मी डोंबिवली शहरात केलेली विकास कामे पाहून लाखो रुपये बक्षीस द्यावे लागतील.शहरातील विकासकाम कोणत्यातरी ठाकरेनी सांगितली म्हणून होत नाहीत असा मनसेवर पलटवार केल्याने डोंबिवलीत= भाजप विरुद्ध मनसे असा वाद रंगणार असल्याचे दिसून येत आहे.काल डोंबिवली जिमखाना येथे राज्यमंत्री चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण १० वर्षापासून डोंबिवली प्रतिनिधित्व करत असून या १० वर्षात एक तरी प्रकल्प एक तरी विकास काम जे पूर्ण झाल आहे आणि जे पूर्ण झालेल्या विकास कामात कोणतही घोटाळा आणि कोणतीही चौकशी लागू नसेल अस एक तरी विकास काम दाखवा, त्यांना मनसे डोंबिवली कडून ५०१ रुपयांचा बक्षीस दिले जाईल असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना करण्यात आले होते .या टीकेचा समाचार राज्यमंत्री चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी चव्हाण म्हणाले, यांनी अनेक लोक म्हणतात या शहरात काय आहे ,या शहरात एखादे विकास काम कोणत्या तरी ठाकरेंनी सांगितली म्हणून होत नाही. हे काही जादुच्या कांडीसारख काम नाही. राम भाऊ म्हाळगी , राम भाऊ कापसे या भाजप नेत्याच्या काळापासून विकास कामे सुरु आहेत. त्यांचा विचार जपतो आहे आणि तो विचार आम्हाला पुढे न्यायचा आहे त्या विचारा सोबत राहणारे असंख्य माणस या शहरामध्ये राहत आहेत.मनसेच्या आव्हानाला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भाजप विरुद्ध मनसे असा वाद रंगणार असल्याचे दिसून येत आहे.