महाराष्ट्र

तिवरे धरणप्रकरणी मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई  : रत्नागिरी जिल्ह्यातीलतिवरे धरण फुटून झालेल्यादुर्घटनेतील जीवितहानीबाबतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीतीव्र दु:ख व्यक्त केले आहे. यासंदर्भातील मदतकार्याचा सातत्यानेआढावा घेण्यात येत असून याघटनेस जबाबदार असलेल्याकारणांचा शोध घेऊन संबंधितांवरकारवाई करण्यात येईल, असेहीत्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्यामुसळधार पावसामुळे चिपळूणतालुक्यातील तिवरे येथील धरणफुटल्याची घटना काल रात्री घडली.त्यात एक वाडी वाहून जाऊन काहीलोक बेपत्ता झाले आहेत, तसेचकाही मृतदेह हाती लागले आहेत.या घटनेचे वृत्त कळताचमुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीययंत्रणेशी संपर्क साधून मदतकार्याबाबत सूचना दिल्या आहेत.जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीयआपत्ती निवारण दलाकडून सुरुअसलेल्या मदतकार्याची त्यांनीमाहिती घेतली. या दुर्घटनेचीचौकशी करुन पुढील कार्यवाहीतातडीने केली जाईल, असेही त्यांनीस्पष्ट केले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!