ठाणे

शाळेची संरक्षण भिंत कोसळून तिघांचा मृत्यू एक जखमी

http://facbook ,twiter ,whatsaap, Email

डोंबिवली :- ( शंकर जाधव  )  दुर्गाडी किल्ला परिसरात असलेल्या उर्दू शाळेची भिंत कोसळून भिंतीचा काही भाग लगतच्या दोन घरांवर पडल्याची काल रात्री साडे बारा च्या सुमारस घडली .या दुर्दैवी घटनेतवर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाले आहेत.

कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळा आहे. रात्री साडे बाराच्या  सुमारास शाळेच्या मागची संरक्षण भिंत अचानक कोसळली. संरक्षण भिंतीचा काही भाग लगतच असलेल्या दोन घरांवर पडल्याने ढिगाऱ्याखाली ४  लोक अडकले होते.घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलीस , अग्निशमन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱयानी घटना स्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिक,  पोलीसअग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र या घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मय्यत मध्ये एक ३ वर्षाच्या चिमुकल्याचा देखील मृत्यू आहे. करीमा मोहम्मद चांद  ( २५ वर्ष ) हुसेन मोहम्मद चांद  (३ वर्ष ) शोभा कचरू कांबले  ( ६० वर्ष )  असे मयताची नवे असून आरती कर्डीले ( १६ वर्ष )  असे जखमी तरुणीचे नाव आहे.या घटनेनंतर रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिम येथील टिळक चौक परिसरात कासारहाट गल्ली येथे वनमाळी दास वाडा या अतिधोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला .सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही या दोन्ही घटना स्थळी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पाहणी करत पालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती लवकरात लवकर पाडण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहे ..महापौर विनिता राणे आणि स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे ,स्थानिक नगरसेवक कासिफ तानकि यांनी घटना स्थळी पाहणी केली . यावेळी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी भिंतीलगत काही अनधिकृत बांधकाम झाल्याच आज निदर्शनास आले ते अनेक वर्षापासून राहत आहेत ते कुणी बांधले, त्यांना  इथे राहण्यास कुणी प्रवृत्त केले याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशा घटना टाळण्यासाठी नागरिकाच्या जीवितास धोका होवू शकतो असा प्रकार निदर्शनास आल्यास पालिकेला महिती द्यावी अशी आवाहन केले. 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!