डोंबिवली:– दि.०८( प्रतिनिधी ) डोंबिवलीजवळील
निळजे गावातील लोढा हेवन येथील मधुबन सोसायटीतील कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला .यात जीवितहानी झाली नसून एक सायकल जळून खाक झाली आहे.ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
डोंबिवली जवळील निळजे गावात चन्द्रेश मधूबन सोसायटी गावदेवी चौक येथे एका खाजगी कॅन्टीन मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला .स्फोट इतका जोरात झाला की कॅन्टीनचे छप्पर फाटले.सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.रविवारी असल्याने या कॅन्टीन मध्ये गर्दी नव्हती.