महाराष्ट्र

डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च आकुर्डी येथे ‘वाहन गतीशिलता’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

पुणेः ऑटोमोबाईल विकसित झाल्याने वाहन हालचाली समजून घेणे महत्वाचे झाले आहे. सुरुवातीला वाहनांच्या हालचालीमुळे आपल्याला वेगवेगळया परिस्थितीमध्ये वाहन कसे प्रतिसाद देईल याची कल्पना येते. या अभ्यासाचे मूळ क्रिएटीव अभियंतेच्या कामात आहेत, ज्यांनी विविध गतीशिल प्रणाल्यांचे कार्य स्थापन केले आहे. पिंपरी — चिंचवड येथील प्रसिद्ध डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च आकुर्डी, पुणे येथे ‘वाहन गतीशिलता’  या विषयावर दिनांक 4 जुलै आणि 5 जुलै रोजी ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे आयोजन डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग, मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च मधील मेकॅनिकल विभाग आणि एसएई इंडीया यांनी केले होते. या कार्यक्रमाला एसएई इंडीयाचे संचालक संजय निबंधे, सचिव नरहरी वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील यांच्यासह मकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. किरण नारकर आणि डॉ. सुनिल डंबारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ पार पडले. या दरम्यान एसएई इंडीयाचे संचालक संजय निबंधे म्हणाले की अभियंत्यांनी वाहन बनविताना वाहन एरगोनॉमिक्स याचाही विचार करावा.
या कार्यशाळेला प्रमुख वक्ते डॉ. रविंद्र कोल्हे (संचालक एनबी टेक्नॉलॉजिस) हे उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विविध कंपनीतील अभियंते आणि अभियांत्रिकी, महाविद्यालयातील 58 विद्यार्थी सहभागी होेते.
एसएई इंडीया (वेस्टर्न सेक्शन)चे व्यवस्थापक सुधीर वैद्य व संचालक रमेश पसारीजा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा पुढील येणार्‍या काळातील विद्युत वाहनांसाठी महत्वाचे ठरेल. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आ. सतेज पाटील, संस्थेचे संचालक कर्नल एस.के.जोशी (निवृत्त), उपकुलसचिव वाय.के.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!