ठाणे

डोंबिवली स्थानकात विजेचा लपंडाव.., तिकिट विक्री, उदघोषणा, इंडिकेटर यंत्रणा फेल.

डोंबिवली –  ( शंकर जाधव )     मध्य रेल्वे – इगतपुरी आणि लोणावळा येथे ग्रीड फेलर झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आज डोंबिवली स्थानकात सकाळी  विजेचा लपंडाव  सुरु  होता. त्यामुळे स्थानकातील बाहेरील तिकीट विक्री  ऐवीएम यंत्रणा, अंतर्गत तिकिट विक्री व उदघोषणेवर परिणाम झाला.त्याचप्रमाणे इंडिकेटर सुध्दा बंद होते.डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण दरम्यान   एक्सप्रेस गाड्या थाबल्या होत्या.
  बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास डोंबिवली स्थानकात विजेचा  लपंडाव सुरु झाल्याने विजेवर अवलंबून असणारी यंत्रणा काम करेनाशी झाली.त्यामुळे त्याचा फटका तिकिटविक्री करणाऱ्या यंत्रणेवर झाला.बाहेरील तिकिट विक्री करणारी एवीएम यंत्रे बंद पडली.अचानक वीज गेल्याने प्रवाशांना  तिकिट देणे मुश्कील झाले.त्यामुळे तिकिटाच्या रांगेतील प्रवाशी संतप्त झाले.तर अंतर्गत तिकिट विक्री वर विजेच्या लपंडावाचा परिणाम झाला. स्थानकातील उदघोषणा बंद झाल्याने गाड्यांबांबत
स्थिती कळत नव्हती.इंडिकेटर देखील बंद झाल्याने प्रवाशांना योग्य माहिती मिळत नव्हती.कसारा – कर्जत  ते सिएस्टीम दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने होत होती.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!