ठाणे

आमदार नरेंद्र पवार यांची खेळाडूंना न्याय मिळवून देण्याची दिली ग्वाही.

 कल्याण :  शासनाच्या शालेय स्पर्धेमध्ये सीबीएससी (CBSE) व आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या खेळाडूंची घुसखोरी ह्या विषयाला आता राज्यांमधून चांगलाच पाठिंबा व प्रतिसाद मिळत असून कल्याण चे आमदार श्री नरेंद्र पवार यांनी या विषयांमध्ये लक्ष घातले असून राज्यातील स्टेट बोर्डाच्या शाळेतील खेळाडूंना न्याय मिळेपर्यंत हा लढा आपण सुरू ठेवणार अशी ठाम ग्वाही क्रीडा संघर्ष समिती ला दिली तसेच हा मुद्दा क्रीडामंत्री श्री आशिष शेलार यांच्या पर्यंत आक्रमकपणे मांडणार असे ही सांगितले आता हा विषय मार्गी लावण्यासाठी क्रीडा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ची स्थापना करण्यात आली आहे. या संघर्ष समिती समितीने आज आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले पुढच्या आठवड्यामध्ये क्रीडा मंत्र्यांची क्रीडा संघर्ष समिती  भेट घेणार असून त्यांना राज्यातील स्टेट बोर्ड च्या खेळाडूंवर होणाऱ्या अन्याय  बद्दल माहिती देऊन  खेळाडूंना न्याय देण्यासाठी दाद मागण्यात येणार आहे. या बैठकीसाठी छत्रपती पुरस्कार विजेते श्री विलास वाघ, राज्य क्रीडा धोरण समितीचे सदस्य श्री अविनाश ओंबासे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री गुलाबराव पाटील, क्रीडा भारती कोकण विभाग अध्यक्ष श्री महादेव शिरसागर, खो-खो संघटनेचे संघटक श्री कृष्णा माळी, ग्लोबल कॉलेजचे प्राचार्या सौ.सुप्रिया नायकर, प्रगती कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.लक्ष्मण इंगळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा समितीचे सदस्य श्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री प्रवीण खाडे,  टिळकनगर विद्यामंदिर डोंबिवली उपमुख्याध्यापिका सौ.लीना ओक मॅथ्यू, वाणी विद्यालयाचे क्रीडाप्रमुख श्री गजानन वाघ, मॉडेल कॉलेजचे श्री सुभाष गायकवाड, पेंढारकर कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. उदय नाईक, व क्रीडा संघटक, खेळाडू,पालक उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!