ठाणे

गुरुपोर्णिमेनिमित्त डॉ. जितेंद्र निसाळ यांचा जय मल्हार मंडळाने केला सत्कार

 डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) जय मल्हार मंडळ आणि विष्णूनगर पोलीस महिला दक्षता समितीच्या वतीने गुरुपोर्णिमेनिमित्त डोंबिवलीतील अपेक्स हॉस्पिटलचे डॉ. जितेंद्र निसाळ यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. यावेळी जय मल्हार मंडळाच्या अध्यक्षा काशीबाई जाधव, ताराबाई त्रिभुवन, विमल पुजारी, उषा सोनाल, लोचना पवार, रुपाली जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच डॉ. प्रधान,कामत आणि डॉ. राजीव गुप्ता यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी काशीबाई जाधव म्हणाल्या, रुग्णांचा जीव वाचविण्याचे महान काम करतात. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांचे आभार मानत असले तरी गुरुपोर्णिमेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार करणे हेही महत्वाचे आहे.तर डॉ.निसाळ यांनी काशीबाई जाधव आणि महिला पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी हॉस्पिटलमधील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतुक केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!