ठाणे

अतिधोकादायक साई सदन इमारत पाडण्याचे काम सुरू…… रहिवाशी संतप्त

डोंबिवली :-  ( शंकर जाधव   )येथील प्रगती कॉलेज जवळील नादिवली रस्त्यावरील अतिधोकादायक `साई सदन`इमारत पाडण्याचे काम आज सुरू करण्यात आले मात्र या प्रसंगी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला व घरमालक आम्हाला काय देणार असा सवाल करत निदर्शने केली. नादिवली येथे साई सदन १ ते ६ तळ अधिक तीन मजली अतिधोकादायक इमारती आहेत अधिकारी व घरमालक यांनी संगनमत करून रहिवाश्याना विश्वासातघेतले नाही व परस्पर कारवाई सुरू केली असा आरोप रहिवाशी करत आहेत. सहा इमारती पैकी १, २ व ३ या तीन इमारती अतिधोकादायक असून बुधवारी २  क्रमांकाची इमारत पाडण्याचे कामसुरु करण्यात आले. या संदर्भात `ग`प्रभाग अधिकारी चंद्रकात जगताप यांना विचारले असता त्यांनीरहिवाश्याचा विरोध इमारत पाडण्यासाठी नाही तर `घरमालक आम्हाला काय देणार` असा प्रश्न संतप्त रहिवाश्यांनी केला.  नागरिकांनी या पूर्वीच जागा रिकामी केली असून साई सदन १,२ व ३ या अतिधोकादायक असल्याने ती पाडण्याची कारवाई सुरू केल्याचे सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!