ठाणे

आज पुन्हा कोपर-डोंबिवली दरम्यान लोकल मधून पडून तरुण ठार.

ठाणे : प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज सकाळी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका २६ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिव वल्लभ कुमार असं या तरुणाचं नाव आहे.

शिव वल्लभ कुमार हा २६ वर्षांचा तरुण डोंबिवलीत राहत होता. मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे आज तो कामावर निघाला होता. कर्जतकडून येणारी ८ वाजून ५० मिनिटांची जलद लोकल त्यानं पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. डोंबिवली-कोपरदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो लोकलमधून खाली पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. डाऊन दिशेकडून येणाऱ्या लोकलच्या मोटरमननं या घटनेची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकात दिली. त्यानंतर काही वेळाने रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिव वल्लभ कुमारचा मृतदेह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात नेला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!