ठाणे

भातसा नदीच्या तीरावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

ठाणे दि. 30 : सततच्या पावसामुळे भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे 1.25 मीटर इतके उघडण्यात येऊन भातसा धरणातून सुमारे 444 क्युमेक्स विसर्ग प्रवाहित केला जात आहे.

भातसा नदीच्या तीरावरील शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगांव पूल, सापगांव व नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात प्रवेश न करण्याच्या व दक्षता घेण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उप जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!