ठाणे

डोंबिवलीतील कृष्णराधा सोसायटीतील पिण्याच्या पाण्यात चिखल आणि कचरा

डोंबिवली : ( शंकर जाधव  )  पाण्याच्या लाईनमधून कचरा आल्याने त्रस्त नागरिकांनी बुधवारी पालिकेच्या डोंबिवली विभागिय कार्यालयात पाणी पुरवठा विभागाला जाब विचारला. मात्र पाणी पुरवठा विभागाने हि गंभीर बाब नसून आवश्यक वाटल्यास पाण्याची लाईन बदलून देऊ असे सांगितले.तर `फ`प्रभाग क्षेत्र सभापती विश्वदीप यांनीसदर बाब गंभीर असल्याचे सांगितले. डोंबिवली पूर्व येथील टिळक रोड परिसरातील कृष्ण राधा सोसायटीतील रहिवाशांनी पाण्यामध्ये कचरा येत होते. याआधीही पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो तसेच पाण्यात कचरा येतो यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकारी  दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

                            डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हण सभेजवळील कृष्णराधा  ही सोसायटी १९८३ साली बांधली असून या सोसायटीत एकुण १६ घरे आहेत. या घरात राहणारे रहिवाशी ज्येष्ठ नागरिकच आहेत. मात्र या सोसायटीत कमी दाबाने  पाणी पुरवठा होत असल्याचे सांगत सध्या येत असलेल्या पाण्याच्या लाईनमध्ये  झाडाच्या काड्या, कचरा, पाने, चिखल यासारखा कचरा वाहून येत असल्याचे सांगितले. रहिवाशांच्या सोयीसाठी आणि स्वच्छ पाणी यावे यासाठी ज्या नळातून पाण्याची टाकी भरते त्या नळाला एक गाळणी लावली असून या गाळणीत हा सर्व कचरा अडकतो. त्यामुळे दर १५ दिवसाने टाकीत पाणी भरत नसल्याचे सदस्यांच्या लक्षात आले. पाण्याची टाकी उघडून बघितली असता या गाळणीत कचरा अडकत असल्याचे समजताच त्यांनी महापालिकेत सभापती विश्वदीप पवार यांच्या कार्यालयात धाव घेतली.  दर १५ दिवसाने गाळणी साफ करून घ्यावी लागत असून पाणी कमी दाबाने येत असल्याचे सांगत अनेक दिवस ,तक्रार करत असून पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी रहिवाशांनी केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार ३ वेळा पाण्याची वाहिनी बदलून घेतली असली तरी पाण्याचा दाब अद्याापही कमी आहे. पाणी पूरविण्याची जबाबदारी सर्वस्व महानगरपालिकेची असून अम्ही कितीवेळा हेलपाटे घालावे असा सवाल या ज्येष्ठ रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे. मुळातच महापालिकेचे पाणी फिल्टरेशन करून येते. तरीही पाण्यात इतका कचरा कसा  काय येतो असा सवाल विचारत पालिकेच्या फिल्टरेशन मशीन कुचकामी आहे का अशी शंका  कृष्ण राधा या सोसायटीतील रहिवाशांनी  व्यक्त केली आहे. मुळातच या सोसायटीतर्फे अनेक प्रकल्प राबविले जात असून ज्या सुविधा पालिकेने देणे आवश्यक आहे त्या द्यााव्या असे मत रहिवाशांनी मांडले आहे. या संदर्भात माहापालिका पाणी पुरवठा विभागात चौकशी केली असता कमी दाब आणि खराब पाण्याची तक्रार आल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. ही इमारत रस्त्याच्या टोकाला असल्याने येथील जलवाहिनीतून कमी दाबाने पाणी येत असून या जलवाहिनीत कचरा अडकून राहतो. हा तांत्रिक बिघाड असल्याचे संगीतले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!