ठाणे

भव्य काॅवरीया पदयात्रेतील कावडीयांना डोंबिवली रिक्षा चालक ( मेन स्टॅड – नाईट ग्रुप ) च्या वतीने प्रसादाचे वाटप…

डोंबिवली  : श्रावणी मास शिवरात्र निमित्त निघालेल्या भव्य काॅवरीया पदयात्रेतील कावडीयांचे मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर येथे डोंबिवली रिक्षा चालक ( मेन स्टॅड – नाईट ग्रुप ) च्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी डोंबिवली रिक्षा चालक ( मेन स्टॅड – नाईट ग्रुप ) च्या वतीने सर्व रिक्षाचालकांनी कावडीयांना दुध आणि फळे यांचे वाटप केले.

भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, मुकेश पांडे, धर्मपाल, दिनेश पांडे, दिनेश चौबे यासंह अनेक रिक्षाचालकांनी कावरिया यात्रेतील कावडीयांना दुध आणि फळाचे वाटप केले. दरवर्षी श्रावण महिन्यात उत्तरप्रदेशवासी महादेवाची मनोभावे पूजा करतात. डोंबिवलीत असंख्य बिहार,उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील नागरिक मोठय संख्येने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने रहातात.दरवर्षी महादेव मंदिरातून कावडयात्रेचे आयोजन करतात.यंदाही सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथून आज सकाळी महादेव मंदिरातून कावडीया पदयात्रेस प्रारंभ झाला. दरवर्षी डोंबिवली शहरातून मागर्स्थ होणाऱ्या यात्रेचा समारोप अंबरनाथ येथील शिव मंदिरात होतो. या यात्रेत हजारो कावडीया दुधाने भरलेले कावड घेऊन यात्रेत सहभागी होतात. या कावडीयांचे स्वागत डोंबिवलीतील विविध चौकात करण्यात येते. या चौकात विविध संस्था-संघटनामार्फत फळे आबी दुध यांचे वाटप केले जाते.  या यात्रेत महिला आणि तरुण वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला. यावेळी मुकेश पांडे म्हणाले, या यात्रेतील कावडीयांना दरवर्षी रिक्षाचालक स्वखर्चाने प्रसाद बनवून वाटप करतात.या यात्रेनिमित्त आमचे महादेवाला मागणे आहे कि, देशवासियांना सुखी समाधानी ठेव.देशातील सैनिकांना उदंड आयुष्य देऊ आणि बळीराजाला सुखी ठेव.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!