ठाणे

साथीचे रुग्ण वाढत असताना शास्त्रीनगर रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता

डोंबिवली :-    (  शंकर जाधव   )  पावसाळा सुरू होताच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात  रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. पावसामुळे मलेरिया ,डेंग्यू ,कावीळ हे साथीचे आजार वाढत असल्याने बाल रोगतज्ञ ,सर्जन ,सर्वसाधारण डॉक्टर याची तातडीने गरज आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने ठोक वेतनावर डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
       शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील सूत्रांच्या माहितीनुसार रुग्णालयात २९  वैद्यकीय अधिकारी असून त्या पैकी १६  कायम तर ०९  कंत्राटी अधिकारी आहेत नवीन डॉक्टर्स कमी वेतनामुळे येण्यास तयार नाहीत तज्ञ डॉक्टरला इतर हॉस्पिटल प्रमाणे ६० – ६५ हजार रुपये वेतन देण्याची सूचना करण्यात आली असून सध्या अवघे ४० -४२ हजार मासिक वेतन दिले जात असल्याचे सांगण्यात आले.शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एम आर आय ,सिटीस्कॅन व रक्त तपासणी या अत्याधुनिक सुविधा होत असताना तज्ञ डॉक्टर मात्र नाहीत त्यामुळे किमान ठोक वेतनावर तरी डॉक्टर नेमण्याची गरज आहे शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी शासनाची १०८  क्रमांकाची मोफत रुग्णवाहिका मिळते ती लोकसभा निवडणुकीच्या काळात काढून घेण्यात आली ती सेवा पुनः मिळण्याची गरज आहे. महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिलांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तदाब आणि सर्दी-ताप आदींसाठी गोर-गरीब रुग्णांची गर्दी होत असते.  पाऊस पडत असल्याने भिजल्यामुळे  रुग्ण  मोठ्या प्रमाणत वाढत असल्याचे सांगण्यात आले  त्वचारोग बरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने रुग्ण पुन्हा-पुन्हा येत असतात.शास्त्रीनगर रुग्णालयात अद्याप स्त्रीरोग, बालरोग, सर्जन, रेडीओलॉजीस्ट व सोनोलॉजीस्ट, पॅथॉलॉजीस्ट, फिजीशीयन अशा १३  तज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याशिवाय सहाय्यक प्रयोगशाळातंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, स्टाफनर्स, लिपिक, कक्षसेवक, आया, पुरुष-सफाई कामगार, वाहनचालक अशा सुमारे 150 पदे रिकामी आहेत. ही रिकामी पदे लवकरात-लवकर भरली गेली तर गोर-गरीब रुग्णांना अधिक चांगली सेवा देता येईल असेही डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी सांगीतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!