ठाणे

बारवीधरणाची उंची वाढल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही – उद्योग  खनिकर्म मंत्री सुभाष देसाई

 ठाणे  : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प आज पूर्ण झाला असल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.  संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे हे बारवी धरण पूर्ण क्षमतेनुसार भरले आहे ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे देसाई म्हणाले.
      उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले म्हणून बारवी धरणाचे जलपूजन आज भरपावसात आनंदी वातावरणात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
 या वेळी आमदार किसन कथोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. पी. अन्बलगन, सह मुख्यकार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकनेर, प्रादेशिक अधिकारी चिकुर्ते,  मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे, अधिक्षक अभियंता कालिदास भांडेकर, कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण, संतोष कळसकर, अरुण कटाळे,  तहसिलदार लदार जयराज देशमुख,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वायले आदी मान्यवर उपस्थित होते.
         या धरणाची उंची वाढवण्याचे काम अनेक वर्षे रखडले होते. दोन वर्षांपूर्वी आपण स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन बैठक घेतली, प्रत्यक्ष गावात जाऊन पहाणी केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यावर तोडगा काढून निर्णय घेतला असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
        गेल्या दोन वर्षातील मेहनत आज यशस्वी झाली आहे. बारवी धारण पूर्ण क्षमतेने भरून वाहताना पाहून खरोखरच आनंद होत आहे, आता जिल्ह्याला पाण्याची टंचाई भासणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पाण्याची पातळी वाढल्याने कोळेवडखळ गावात पाणी शिरलं आहे. त्या गावातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केलें आहे. त्यांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे शासनाचे धोरण असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!