ठाणे

दिवा शहरातील ९० टक्के पुरग्रस्त सरकारी मदतीपासून वंचित ….. सरकारवर नाराजी…

डोंबिवली (शंकर जाधव) अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.एकीकडे राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत करण्यास कुठेही कमी पडत नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे मात्र दिवा शहरातील ९० टक्के पूरग्रस्तांना सरकारी मदत मिळाली नाही.

दिव्यात शहरात पुरस्थितीत २२ हजारापेक्षा जास्त कुटुंब बाधित झाली असल्याचे सर्वेक्षण महापालिकेतर्फे करण्यात आले. परंतु महापालिकेतर्फे फक्त अडीच हजार कुटुंबांनाच मदत आली असल्याचे प्रभाग समितीच्या वतीने सांगण्यात येते. त्यामुळे दिवा विभागातील ९० टक्के सरकारी मदतीपासून अजूनही वंचित आहेत. सरकारने दिव्यातील पूरग्रस्त वाऱ्यावर सोडल्याचे दिसत असल्यांने दिवावासीयांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.पूरग्रस्तांना ही तुटपुंजी मदत मिळवण्यासाठी ३ ते ४ चार किलोमीटरची पाययपीट करावी लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक तसेच विशेषतः महिला वर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.आधीच पुरामुळे संसाराचा कंबरडा मोडल्या नंतर मदत मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत दिव्यातील पूरग्रस्तांना करावी लागत आहे. दिव्यातील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आयुक्तांची भेट घेऊ असल्याचे भाजपा दिवा शहर अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!