शहापूर (आशा रणखांबे) : ए. बी.एम. समाजप्रबोधन संस्था कल्याण संचलित दामोदर विशे आदिवासी (कातकरी)मुलींचे शैक्षणिक संकुल चांग्याचा पाडा, आश्रम शाळेत मोठ्या उत्साहात भारताचा ७३ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
ए. बी.एम. समाज प्रबोधन संस्थेची संचालिका पूनम भडांगे यांच्या हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले. सदर कार्यक्रम ए बी.एम संस्थेचे सरचिटणीस अतुल भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून शाळेचे चेअरमन डि. आर .पडवळ , दामोदर विशे, लेखक, कवी नवनाथ रणखांबे, सूर्यकांत भडांगे , जनार्दन हरणे , अँड प्रेरणा भडांगे, स्वागत विशे, धनंजय व आरती गीते ,जयवंत भडांगे तर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध भाषेत मुलींनी स्वातंत्र्य लढ्यावरील आणि महामानव यांच्या स्वातंत्र्य लढ्यावरील योगदान आणि कार्यावर भाषणे करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी क्रांतीकारकांच्या स्वातंत्र्य चळवळी बरोबर, भारतीय संविधान आणि संविधान निर्मितीमध्ये संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेकडर यांचे महान कार्य भारताच्या स्वातंत्र्य लढयात महत्वाचे आहे. असे कवी नवनाथ रणखांबे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. भाषणातून प्रेरणादायी विचार समाजसेवक सुर्यकांत भडांगे आणि अँड. प्रेरणा भडांगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. माझ्या शाळेच्या आदिवासी कातकरी मुलीं हिंदी, इंग्रजी , मराठी या भाषेत भाषण करीत आहेत हेच मी स्वातंत्र्य समजतो असे मत यावेळी ए. बी.एम समाज प्रबोधन संस्थेचे सरचिटणीस अतुल भडांगे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रमुख आशा रणखांबे यांनी यावेळी मुलींच्या ज्ञानात भर पडावी व इतिहास समजावा म्हणून नाण्यांचं प्रदर्शन भरवले. ब्रिटिश कालखंडापासून आज पर्यत उपलब्ध असणाऱ्या जुन्या नाण्यांची माहिती मुलींना यावेळी देण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक तनुजा पाटील, सुत्रसंचालन संदिप पडवळ यांनी केले तर आभार भास्कर विशे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होणासाठी सर्व शिक्षक वृंद , भीमराव राऊत, जयश्री खंडबी, रेशमा उघडा आणि इतर कर्मचारी वृंद यांनी मेहनत घेतली.