ठाणे

शिवशिल्प दुरुस्तीसाठी मराठा मोर्चाची ठामपावर धडक! सत्ताधार्‍यांसोबत झाली हमरीतुमरी

ठाणे :  ठामपा मुख्यालयावरील शिवशिल्प मोडकळीस आलंय. गेली 3 वर्षे सातत्यानं पाठपुरावा करून संतापलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अखेर  मंगळवारी ठामपावर धडक दिली आणि महापौरांना वर्गणीचे पैसे देऊ केले. पैसे घ्या पण शिवशिल्प दुरुस्त करा, अशा घोषणा होताच महापौर, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के आणि मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये महापौर दालनातच प्रचंड हमरातुमरी झाली.
क्रांती मोर्चाचे समन्वयक कैलाश म्हापदी, रमेश आंब्रे, संतोष सुर्यराव, अविनाश पवार, अजय सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्ते शांतपणे निवेदन देण्यास गेले असताना सभागृह नेते म्हस्के कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले. म्हणून कार्यकर्त्यांनी मदतीचा चेक आणि निवेदन फाडून सत्ताधार्‍यांचा विरोध केला तर ठामपा आयुक्तांनी मात्र क्षणाचाही विलंब न लावता या शिवशिल्प दुरुस्तीला 10 लाखांचा निधी देऊन उद्यापासून तत्काळ काम सुरू करण्याचे लेखी आदेश दिले.
मराठा क्रांती मोर्चानं आयुक्तांचे आभार मानतानाच कार्यकर्त्यांना फालतु म्हणणार्‍या शिवसेनेचा धिक्कार केला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!