गार्डीयन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने अभ्यूदय प्रतिष्ठान डोंबिवली संचालित पूर्वांचल विकास प्रकल्प या वसतीगृहाला दिली भेट

डोंबिवली  :  गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 या सुवर्ण दिनाचे औचित्य साधून गार्डीयन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने अभ्यूदय प्रतिष्ठान डोंबिवली संचालित पूर्वांचल विकास प्रकल्प या वसतीगृहाला भेट दिली. या वसतीगृहात नागालँडमधील मुले राहतात.
ही संस्था 9 मार्च 1999 रोजी डोंबिवली येथे स्थापित करण्यात आली. गेली 17 वर्षे ही संस्था उत्स्फुर्तपणे कार्यरत आहे. हे विद्यार्थी स्वामी विवेकानंद विद्यामंदीर (इंग्रजी माध्यम) मध्ये शिक्षण ग्रहण करतात. आजवर 25 विद्यार्थी एसएससी उत्तीर्ण, दहा विद्यार्थी ग्रॅज्युएशन उत्तीर्ण, एक विद्यार्थी एमबीए तर एकाने पत्रकारीतेमध्ये अध्ययन पूर्ण केले आहे आणि हे सर्व विद्यार्थी मोठ्या जोमाने नाालँडमधील विविध क्षेत्रात तेथील मुलांच्या विकासासाठी प्रत्यक्ष — अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत.
गार्डीयन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सिंदु हेमंत, विद्यालयाचे इयत्ता सहावीचे सहा स्काऊट्स, सहा गाईड्स, स्काऊट मास्तर पितांबर जडे, गाईड कॅप्टन शर्मिष्ठा जहागिरदार, राजश्री प्रमोद, प्रीमा पतंगे, श्वेता वर्धमान, प्रियदर्शनी पानिग्रही हे शिक्षकगण आणि रुपेश दादा यांनी संस्थेला सहृदय भेट दिली. सर्व गाईड्सनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना राखी बांधून सामाजिक बांधिलकीचे महत्व पटवून बंधुत्वाची भावना प्रस्थापित केली.
इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या पुस्तकांचे वाटप प्राचार्या सिंदु हेमंत व स्काऊट्स — गाईड्स यांच्या हस्ते करण्यात आले.
गार्डीयन विद्यालयाच्या स्काऊट्स — गाईड्स यांनी देशभक्तीपर समूहगान सादर केले. तत्पश्चात वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करुन निरोप घेण्यात आला.  सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन कार्यरत असलेल्या पूर्वांचल विकास प्रकल्पासाठी शक्य ती मदत गार्डीयन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सदैव करेल असे आश्वासन प्राचार्या सिंदु हेमंत यांनी दिले.
PHOTO  GALLERY

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!