ठाणे

आंदोलनानंतरही दाद न मिळण्यास `सौ सोनारकी एक लोहरकी` या प्रमाणे देशव्यापी आंदोलन – दयानंद किरतकर

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) ईव्हीएम बाबत सर्वात अगोदर बसपाने सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला आहे.रस्त्यावरच्या आंदोलनाने सामान्य कार्यकर्ता यांच्यावर गुन्हे दाखल होतात. राष्ट्रीय संपतीची इतर लोक गर्दीचा फायदा घेउन नुक़सान करतात. तेव्हा राष्ट्रीय संपतीची सुरक्षा व कार्यकर्ता गुन्हे, कोर्ट, तुरुंग या मध्ये गुरफटुन चळवीळाला अडथळे संभवतात. यासाठी न्यायालयात लढा हा सर्वोत्तम सनदशीर मार्गाने आंदोलन योग्य तरीही दाद न मिळाली तर मग मात्र `सौ सोनारकी एक लोहरकी`या प्रमाणे देशव्यापी आंदोलन उभे करणे हा पर्याय प्रसंगवधानाने योग्य ठरेल दरवर्षीप्रमाणे २८ आँगस्टला  माझा वाढदिवस आहे. परंतु   राज्यातील  देशातील बहुसंख्य भाग पुराने कठिण परिस्थीला तोंड देत आहे. अश्या वेळी वाढदिवसाला येणारा खर्च पुरग्रस्थ लोकांना द्यावा हे उचित ठरेल. असं मला वाटत म्हणुन, आम्ही वाढदिवस सोहळा पुरग्रस्त   जनतेच्या सानिध्यात करुन,  त्यांना यथाशक्ती सहाय्य करण्याचे मानस आहे. सामाजीक बांधीलकी प्रत्येकाने जोपासली  पाहीजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज घडविण्यात प्रयत्नशिल असला पाहीजे असाच संदेश या वाढदिवसाच्या  निमित्ताने  देत असल्याचे बसपा महाराष्ट्र राज्याचे महासचिव दयानंद किरतकर यांनी सांगितले.

 

महासचिव दयानंद किरतकर म्हणाले, देशातील इतर सारे राजकीय पक्ष आणि  बसपा यात फरक आहे. आम्ही जनतेला पटवुन देण्याचा  प्रयत्न करतो कि,  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेतुन विकासाच्या प्रवाहात तमाम जनतेला सामावणारी  निर्माण केली. आम्ही सत्तेवर आलो तर या घटनेची  तंतोतंत अंमलबजावणी करु.बसपाच्या युतीबाबत माध्यमातून चर्चा होते. युतीबाबत सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख बहनजी मायावतीजी व वरिष्ठ घेतील. माझे व्यक्तीगत मत असे आहे. समविचारी पक्ष सन्मानाने  बोलणी करून,  आपआपली ताकद समजुन घेतील तर युती होण्यास काही अडसर रहाणार नाही. कोल्हापूर, सांगली, कोकण, ठाणे आणि उर्वरित राज्यात  पुरग्रस्थ परिस्थीती झाली. त्यास सर्वस्वी देशातील स्वातंत्र्यानंतर काळातील प्रस्थापीत केंद्रातील सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. नद्या जोड प्रकल्प, प्रत्येक जिल्हयात धरणे, योग्य सिंचन त्यावर वीज उत्पादन प्रकल्प अस भारतास  समृद्ध करणारे कृषी प्रधान  मुद्दे होते. परंतु देशाच्या विकासासाठी अंत्यत आवश्यक विचार  तत्कालीन सरकारने  आणि  आजवर केंद्रांत सत्ता उपभोगत्यांनी अंमलात आणले नाही. परिणामी पुरा सारखी संकटे, दुष्काळी मानवनिर्मित आपत्ती जनतेला भोगावी लागत आहे.म्हणुन पोटतीडकिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची देशाला नितांत गरज आहे हे आम्ही सांगत असतो.

लोकसभेच्या निवडणुकीत  तमाम आंबेडकरी जनता जी बसपाची बहुतांश वोट बँक होती. ती भावनिक  होउन डॉ.बाबासाहेबांच्या रक्ताच्या वारसाकडे वळली. परिणामी कालांतराने जनतेच्या लक्षात आले कि, आम्ही एक प्रकारे वंचित आघाडीकडे आकर्षित होउन  भाजपसारख्या जातीवादी पक्षालाच त्याचा फायदा करित आहोत. बाबासाहेबांच्या  विचार प्रणालीवर चालणारे अनेक पक्ष आहेत. परंतु  राष्ट्रीय मान्यता असणारा,  विविध राज्यात आमदार खासदार निवडुन आणणारा बसपा एकमेव पक्ष आहे. २००९ च्या निवडणुकीत लोकसभेचे २१ खासदार तर राज्यसभेचे २३ खासदार असणारा एकही पक्ष बसपा शिवाय अस्तीत्वात नाही. अशी देशातील तिसरी राजकीय  ताकद असणा-या  शक्तीला अधीक बळकट करण्याची  आज काळाची गरज आहे. बहन मायावतीजीच्या लोकप्रिय न्यायप्रिय नेतृत्वाला बहुजन समाज स्विकारेलच,  तसेच प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, प्रदेश प्रभारी उ.प्र.चे आमदार रामअचल राजभर, खासदार अशोक सिद्धार्थ यांची कुशल कार्य प्रणाली व झंझावती दौरे बसपाला यश मिळवुन देईल व महाराष्ट्रात इतिहास घडेल. महाराष्ट्र राज्यातील  सर्वच २८८ विधानसभा मतदार संघात बसपा उमेदवार  उभे करणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!