ठाणे

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी दिपाली दिलीप पाटील यांची निवड

ठाणे दि २६ ऑगस्ट २०१९ : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी दिपाली दिलीप पाटील यांची आज ( २६ ऑगस्ट २०१९ ) रोजी बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी पीठासन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी काम पाहिले. तर सचिव म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी  (प्रशासन) डी. वाय. जाधव यांनी काम केले.

या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, सर्व विषय समिती सभापती, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!