ठाणे

राबोडीतील परवेज 12 दिवसांपासून बेपत्ता

ठाणे – राबोडी येथील क्रांतीनगर येथे राहणारा परवेज शमसुद्दुह खान हा 13 वर्षाचा मुलगा मागील 12 दिवसांपासून हरवला असून राबोडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर मुलगा कोणाला सापडल्यास राबोडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन त्याचे वडील शमसुद्दुह खान यांनी केले आहे.
परवेज खान हा राबोडी येथील सरस्वती शाळेमागील क्रांतीनगर येथे राहण्यास असून तो राबोडी येथील आरएफसी उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. मात्र दिनांक 17 ऑगस्ट रोजी तो अचानक बेपत्ता झाला आहे. याबाबत त्याच्या वडिलांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!