ठाणे

साथीच्या रोगावर नियंत्रण करण्यासाठी रिपाईचे मोफत आरोग्य शिबिर ..

डोंबिवली : ( शंकर जाधव  )  मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबून अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. काही प्रमाणात साथींच्या रोगांचा सामनाही करावा लागला. यामुळे गोर-गरीब वस्तीत सर्दी-ताप यांच्यासह साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव होत होता. रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. पूर्वेकडील इंदिरानगर आणि पाथर्ली विभागात पार पडलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

मोफत आरोग्य शिबिरात रक्त तपासणी, मधुमेह, मलेरिया, ताप, उलटी, जुलाब, लहान मुलांचे आजार आणि मोफत नेत्र तपासणी आदी सेवा देण्यात आली. नेत्र तपासणीसाठी ईशा नेत्रालय यांच्या माध्यमातून मोतीबिंदु आदी तपासण्या करण्यात आल्या. कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रभाग क्रमांक 73 इंदिरानगर आणि पाथर्ली गावठण प्रभाग क्रमांक 74 येथील गोर-गरीब गरजूंनी मोफत आरोग्य तपासण्या करून घेतल्या. आरोग्य शिबिरात चष्मा वाटपही करण्यात आले. शिबिरात मेडिकल सोशल वर्कर संतोष घोडेस्वार यांच्या सहकार्याने डॉ. माधुरी सोळंकी आणि बालरोगतज्ञ डॉ. अशोक जोशी यांनी आरोग्य तपासणी केली. मोफत आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी परिवहन सेवाही उपलब्ध करण्यात आली होती. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी डोंबिवली शहर संघटक किशोर मगरे, कार्यवाह दिनेश साळवे, संपर्क प्रमुख तुकाराम पवार, उपाध्यक्ष वसंत टेकाळे तसेच वार्ड कार्यकारिणीतील तेजस जोंधळे, मंगेश कांबळे, उमेश साळवे, नितीन इंगळे, अमोल मोरे आदींनी विशेष मेहनत घेतली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!